इंडियन महिला क्रिकेट टीमची खेळाडू मिताली राज (Mithali Raj) हिचा बायोपिक 'शाबाश मिट्ठू' (Shabaash Mithu) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तापसी पन्नू (Taapsee Pannu) मिताली राज हिची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू झाली असून तापसीनं यासाठी क्रिकेटचा जोरदार सराव सुरू केला आहे. तिच्या या भूमिकेचा एक फोटो तिने नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये हातात बॅट घेतलेली मितालीच्या भूमिकेतील तापसी यात दिसत आहे. (Taapsee Pannu/Instagram)
आपल्या चित्रपटाचे हे पोस्टर शेअर करत तापसी (Taapsee Pannu) हिने एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, मला नेहमी तुझा आवडता पुरुष क्रिकेटर कोण आहे असे विचारले जायचे. परंतु त्यांना हे विचारायला हवे कि, तुमची आवडती महिला क्रिकेटर कोण आहे. यामुळे प्रत्येक क्रिकेट प्रेमीला विचार करायला भाग पडेल की, त्यांचं खेळावर प्रेम आहे की, कोण हा गेम खेळतेय स्त्री कि पुरुष खेळाडू यावर. (Taapsee Pannu/Instagram)
या फोटोत आपल्या खेळाच्या वेशापेक्षा वेगळ्या पोशाखातील मिताली राज अतिशय आकर्षक दिसत आहे. 3 डिसेंबर 1982 ला राजस्थानच्या जोधपूरमध्ये मितालीचा (Mithali Raj) जन्म झाला. वयाच्या 17 व्या वर्षी तिने 1999 मध्ये आयर्लंडविरुद्ध इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत 89 टी-20, 10 टेस्ट आणि 209 वनडे मॅच खेळल्या आहेत. 10 टेस्टमध्ये 663 धावा केल्या असून, 214 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. (Mithali Raj/Instagram)