आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आपल्या बहिणीसोबत भटकंतीला गेली आहे. तिने शेअर केलेले व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहेत.
|
1/ 7
अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या आपल्या बहिणीसोबत मालदीवला फिरायला गेली आहे. मालदिवच्या निसर्गरम्य वातावरणातील फोटो तिने शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम))
2/ 7
तापसीने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/ 7
आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत तापसी मालदीवमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहे. (फोटो - इन्टाग्राम)
4/ 7
बॉलिवूडमधील ताकदीची अभिनेत्री म्हणून तापसीकडे पाहिलं जातं. बॉलिवूडमधील मसाला पटांची चौकट मोडून काढत तापसीने अनेक वूमेन सेंट्रिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
5/ 7
अभिनयासोबतच तापसी फिटनेसकडेदेखील लक्ष देते. मालदिव वेकेशनवर असतानादेखील तापसी व्यायामासाठी आवर्जून वेळ काढते.
6/ 7
तापसी पन्नूने आजपर्यंत हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु सिनेमातही काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तापसीचा मोठा चाहतावर्ग आहे.
7/ 7
आपल्या उत्तम अभिनयासाठी तापसीला आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अभिनयामध्ये उत्तम करिअर करणाऱ्या तापसीने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करुन अभिनयामध्ये पाऊल टाकलं आहे.