आहा! मुंबईच्या समुद्र किनारी स्वीटू घेतेय पावसाचा आनंद; शेअर केला PHOTO
येऊ कशी मी नांदायला ( Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर (anvita phaltankar) सध्या टेलिव्हिजनपासून दूर असून तिच्या आवडत्या ठिकाणी फिरताना दिसतेय. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अन्विताने नुकताच मुंबईच्या समुद्रकिनारी पावसाचा आनंद घेतला. तिथला एक फोटो तिनं शेअर केलाय.
|
1/ 10
सर्वांची लाडकी स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
2/ 10
अन्विता सध्या टेलिव्हिजनवर दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती अनेक पोस्ट शेअर करत असते.
3/ 10
अन्विता फूडी आणि हे सर्वांनाच माहिती आहे मात्र तिला भटकंतीही करायला आवडते. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा अन्विता तिच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जात असते.
4/ 10
मुंबईत सध्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि याच पावसाचा आनंद घेण्यासाठी अन्विता थेट मुंबईच्या मरिन्स लाईन्सला पोहोचली आहे.
5/ 10
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पावसाळी वातावरणाचा मनमुराद आनंद घेतानाचा फोटो अन्वितानं शेअर केला आहे.
6/ 10
'जब मिलें थोड़ी फ़ुरसत, खुदसे कर ले मोहब्बत', असं म्हणत अन्वितानं तिचा गोड फोटो शेअर केला आहे.
7/ 10
अन्विताचा कुल लुक आणि चेहऱ्यावरील क्यूट स्मॉइलनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसंच तिचे येलो क्रॉकर्सही लक्ष वेधून घेत आहेत.
8/ 10
कामापासून सुट्ट्या मिळाल्यानं अन्विता सध्या मज्जा मस्ती करताना दिसते. कधी शॉपिंग तर कधी आउटिंगचे फोटो ती शेअर करत असते.
9/ 10
अन्विता सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोखालील कॅप्शन नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात.
10/ 10
अन्विताला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.