आज सर्वत्र 'कन्या दिवस' अर्थातच 'डॉटर्स डे' साजरा केला जात आहे. सर्व कलाकार आपल्या लेकीसोबत आपल्या खास आठवणी शेअर करून हा दिवस साजरा करत आहे. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनेसुद्धा आपल्या लेकीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत सर्वांना कन्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.