Sushmita Sen Lalit Modi dating: ललित मोदीआधी सुष्मिता सेननं 'या' 10 जणांना केलंय डेट; एकाबरोबरही केलं नाही लग्न
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेन आणि बिझनेसमन ललित मोदीबरोबर डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचे खासगी फोटो शेअर करत ते एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं आहे. ललित मोदी आधी सुष्मिता सेननं जवळपास 10 लोकांना डेट केलं आहे. सुष्मिता सेननं लग्न केलं नाही. मात्र वयाच्या 25व्या वर्षी तिनं दोन मुलांना दत्तक घेतलं. तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही होतात. जाणून घ्या सुष्मिता सेननं आतापर्यंत कोणाकोणाला डेट केलं आहे.
सुष्मिता सेनच्या अफेअर्सच्या लिस्टमधील पहिलं नाव आहे ते म्हणजे दिग्दर्शक विक्रम भट्ट. 'दस्तक' सिनेमाच्या शुटींगवेळी दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हा सुष्मिता सेन 20-21 वर्षांची होती तर विक्रम भट्ट 27 वर्षांचे होते.
2/ 10
सुष्मिता सेन आणि प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संजय नारंगबरोबर रिलेशनमध्ये होती. दोघांना अनेक पार्टी आणि इव्हेंटमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. सुष्मितानं स्वत: त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. मात्र नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
3/ 10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी मॅनेजर बंटी सतदेवबरोबरही सुष्मिता रिलेशनमध्ये होती. तो तिचा मॅनेजर होता. दोघेही डेट करत असल्याच्या अफवा आहे असं म्हणत सुष्मितानं हसत हसत प्रतिक्रिया दिली होती.
4/ 10
सुष्मिता सेन आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांच्याही रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. 'कर्मा और होली' या सिनेमाच्या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. दोघे 3 वर्ष डेट करत होते.
5/ 10
प्रसिद्ध बिझनेसमन इम्तियाज खत्रीबरोबर देखील सुष्मिता डेट करत होती. सुष्मिताला 22 वर्षीय इम्तियाजवर प्रेम जडलं होतं.
6/ 10
दिग्दर्शक मुदस्सर अजीज आणि सुष्मिता याच्या नात्याची चर्चा होती. 2010मध्ये 'दूल्हा मिल गया' या सिनेमात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं.
7/ 10
सुष्मिता सेनचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम यांच्याशी देखील जोडलं गेलं होतं. दोघे एकाच टेलिव्हिजन शोचं निवेदन करत होते. दोघांच्या नात्याची खूप चर्चा रंगली होती.
8/ 10
टॉप बिझनेसमन अनिल अंबानीबरोबर देखील सुष्मिताच्या नात्याची चर्चा होती. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
9/ 10
बिझनेसमन रितीक भसीनला ही सुष्मिता सेन डेट करत होती. दोघेही 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. क्रिकेटर जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या लग्नात दोघांना स्पॉट करण्यात आलं होतं.
10/ 10
2019मध्ये 15वर्ष छोट्या रोहमन शॉलबरोबर सुष्मिता रिलेशनमध्ये होती. दोघांची भेट सोशल मीडियावर झाली होती. दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.