

मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (Sushmita Sen) बॉलिवूडपासून लांब असली तरी, तिच्या कुटुंबात चांगलीच रमली आहे. तिने 2 मुलींना दत्तक घेतलं आहे. तिचा एक बॉयफ्रेंडदेखील आहे. पण त्यांनी स्वत:ला लग्नाच्या बेडीत अडकवलेलं नाही.


सुश्मिताची मुलगी रिनी आता 21 वर्षाची झाली आहे. आपल्या आईप्रमाणेच तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहे.


रिनीच्या पहिल्या मुव्हीचं नाव ‘सुट्टाबाजी’ आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मूव्ही रिलीज होणार आहे. यानिमित्त रिनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.


‘सुट्टाबाजी’च्या सेटवरचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडला आहे. सुट्टाबाजी (Suttabazi) ही मुव्ही तरुण मुलीचं भावविश्व आणि तिच्या आयुष्यात असलेली आईची भूमिका याविषयावर आधारित आहे. विशेष म्हणजे मुव्हीमध्ये कोरोनाचाही संदर्भ घेण्यात आला आहे.


या मुव्हीचं दिर्ग्दशन कबीर खुराना यांनी केलं आहे. तर कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा हे कलाकार रिनीचे आई - वडील म्हणून दिसणार आहेत.