सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा घराबाहेर दिसली EX-गर्लफ्रेंड अंकिता, गरीबांना वाटले चॉकलेट्स
14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सृष्टीमध्ये खळबळ उडाली होती. सुशांतची पहिली रिल हिरोईन आणि एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्याच्या जाण्याने पूर्णपणे हादरून गेली होती. दरम्यान सोमवारी पहिल्यांदा तिला मुंबईमध्ये घराबाहेर पाहण्यात आले.
|
1/ 8

2/ 8
याआधी अंकिता-सुशांतबद्दल बोलताना त्यांचा मित्र संदीप असं म्हणाला होता की, अंकिताने सुशांतसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. त्याने तिच्या दिवंगत आईची जागा घेतली होती.
3/ 8
तो असं म्हणाला होता की, अंकिता सर्वकाही सुशांतच्या आवडीचे करत असे. तिने घराचे इंटेरिअर देखील त्याच्या पसंतीचे केले होते. दरम्यान संदीपने रिय-सुशांतच्या लग्नबाबत माहित नसल्याचे सांगितले होते
4/ 8
सुशांतसाठी ती करिअर सोडायला देखील तयार होती. तर त्यांच्या ब्रेकअप नंतरही सुशांंतसाठी प्रार्थना करत असल्याचेही संदीपने सांगितले होते.
5/ 8
सुशांतच्या जाण्याने अंकिता पूर्णपणे कोलमडली होती. दरम्यान या सर्व प्रसंगामध्ये तिने सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.
6/ 8
अंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या कपल्सपैकी एक हे दोघेजण होते. मात्र त्यानंतर सुशांतचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते.
7/ 8
सुशांतच्या मृत्यूनंतर जेव्हा अंकिता पहिल्यांदा मीडियाच्या कॅमेरात कैद झाली, तेव्हा ती गरीबांमध्ये चॉकलेट्स वाटताना दिसली
8/ 8
सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिताने एक फोटो देखील शेअर केला होता. ज्यामध्ये तिने देवाजवळ लावलेल्या दिव्याचा एक फोटो शेअर केला होता.