SSR Death: तपासासाठी CBIची टीम लवकरच होणार मुंबईकडे रवाना, वाचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातले 10 ठळक मुद्दे
सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजुने निर्णय दिला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत लवकरच दाखल होणार आहे.
|
1/ 10
1- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी CBI करणार
2/ 10
2 - याप्रकरणी मुंबई पोलिसांनी CBI ला सहकार्य करण्याचे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
3/ 10
3 - मुंबई पोलिसांना ही संपूर्ण केस त्याचप्रमाणे डायरीसह जप्त केलेल्या वस्तू CBI ला सोपवाव्या लागणार
4/ 10
4 - या प्रकरणातील इतर केसही CBI कडे दिल्या जाणार आहेत.
5/ 10
5 - इतर केससाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज भासणार नाही
6/ 10
6- CBIचा तपास सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने होणार आहे बिहारच्या नाही
7/ 10
7- बिहारमध्ये दाखल करण्यात आलेली एफआयआर योग्यच आहे, त्याचप्रमाणे बिहार पोलिसांनी केलेली CBI शिफारसही योग्य असल्याचे सुप्रीम कोर्ट म्हणाले आहे.
8/ 10
8- हा तपास मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित केला जावा ही अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे फेटाळण्यात आली आहे.
9/ 10
9-सुप्रीम कोर्टाचा निर्णय सीबीआयच्या बाजुने लागला असल्याने हा महाराष्ट्र सरकारसह मुंबई पोलिसांना मोठा झटका आहे
10/ 10
10- आता लवकरच तपासासाठी CBI ची टीम मुंबईला रवाना होणार आहे.