तब्बल 28 दिवसांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती तुरुंगाबाहेर; पाहा PHOTO
8 सप्टेंबरपासून रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) भायखळा तुरुगांत होती. जामीन मिळाल्यानंतर काही तासांतच ती जेलमधून बाहेर पडली आहे.
|
1/ 10
ड्रग्ज अँगलच्या तपासात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जवळपास महिनाभराने जामीन मंजूर करण्यात आला. (फोटो सौजन्य - अमलन पलिवाल)
2/ 10
तब्बल 28 दिवसांनंतर रिया तुरुंगातून बाहेर आली. भायखळा जेलमधून ती आपल्या सांताक्रुझमधील घरी रवाना झाली. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
3/ 10
रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी जुन्या WhatsApp चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती भायखळा जेलमध्ये होती. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
4/ 10
मुंबई हायकोर्टाने 07 ऑक्टोबरला रियाला सशर्त जामीन दिला आहे. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिची सुटका करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
5/ 10
रियाला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी नाही.कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला देशाबाहेर जाता येणार आहे. यासाठी तपास यंत्रणेकडे तिला पासपोर्टदेखील जमा करण्यास सांगण्यात आलं. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
6/ 10
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार रियाला तिच्या सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे गरजेचं आहे. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
7/ 10
जेव्हा एनसीबीकडून तिला चौकशीसाठी बोलावले जाईल त्यावेळी तिला हजर रहावे लागणार आहे. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
8/ 10
जामीन मिळाल्यानंतर रिया तुरुगांबाहेर आहे. तिला पाहण्यासाठी गर्दीही जमली. रियाचा चेहरा दिसला नाही. मात्र तिची गाडी दिसली. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
9/ 10
रिया आपल्या घरीदेखील पोहोचल्याचं सांगितलं जातं आहे.
10/ 10
याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील मंजूर केला आहे. तर शौविकबरोबर अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - विरल भयानी)