सुरवीन सांगते की इंडस्ट्रीतील बहुतांश महिलांच्या शारीरिक स्वरूपाबाबत, चेहऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अशा वेळी त्यांना अत्यंत अश्लील प्रश्नही विचारण्यात येतात. सुरवीना चावला बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. तिने एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिनं 'हेट स्टोरी 2', 'पार्च्ड', 'क्रिएटर 3D' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सुरवीनने 'सेक्रेड गेम्स' मध्येही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.