Kuch Kuch Hota Hai : करण जोहरने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट 'कुछ कुछ होता है' आजही आतापर्यंतच्या सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील 'टीना' (राणी मुखर्जी) च्या भूमिकेसाठी ट्विंकल खन्नासह अनेक अभिनेत्रींना संपर्क करण्यात आला होता, ज्यामध्ये ऐश्वर्या राय देखील होती. पण ती तमिळ भाषेतील 'जीन्स' चित्रपटात काम करत असल्याने तिनं हे काम करण्यास नकार दिला. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)
Kabhi Khushi Kabhi Gham : ऐश्वर्या राय बच्चनला 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात 'अंजली' (काजोल) ची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी तिने तारखांच्या कारणामुळे नाकारली आणि अखेरीस ही भूमिका काजोलकडे गेली, ज्यामुळे प्रेक्षकांना ती खूप आवडली. त्यांची आवडती ऑन-स्क्रीन जोडी त्यांना पुन्हा पाहायला मिळाली. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)
Veer Zaara : ऐश्वर्याला 2004 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'वीर झारा' या चित्रपटात झारा या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, जी तिने अज्ञात कारणांमुळे नाकारली आणि ती भूमिका प्रीती झिंटाकडे गेली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख आणि प्रितीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)
Chalte Chalte : फार कमी लोकांना माहीत असेल की, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी 'चलते चलते'मध्ये सुरुवातीला मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्यानंतर ऐश्वर्याने 'चलते चलते'मधून बाहेर पडली. सलमान खानने चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीशी वारंवार वाद घातला त्यानंतर ऐश्वर्या रायने हा निर्णय घेतला. तिच्या जागी राणी मुखर्जीला घेण्यात आलं. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)
Dostana : 'दोस्ताना'साठी ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि सैफ अली खान यांची पहिली पसंती होती. पण "टू बॉइज' या चित्रपटाच्या कथेभोवती हा चित्रपच फिरत असल्याने तिनी याला नकार दिला. त्यानंतर सैफ अली खाननेही हा चित्रपट सोडला. अखेर या चित्रपटात प्रियांका चोप्राला कास्ट करण्यात आलं. या चित्रपटात प्रियंकासोबत अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)
Heroine : मधुर भांडारकरने सुरुवातीला ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या 'हिरोईन' चित्रपटाची घोषणा केली. पण, अभिनेत्री यानंतर गर्भवती झाली आणि तिला चित्रपटातून बाहेर पडावं लागलं. अखेरीस, चित्रपट निर्मात्याने तिच्या जागी करीना कपूर खानला घेतलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी, बेबोच्या अभिनयाचं कौतुक झालं. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)
Bajirao Mastani : 'हम दिल दे चुके सनम'च्या सुपर यशानंतर, संजय लीला भन्साळी 'बाजीराव मस्तानी'साठी सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लोकप्रिय जोडी परत आणण्यासाठी उत्सुक होते. मात्र, सलमानसोबतचे तिचं पूर्वीचे नातं लक्षात घेता, ऐश्वर्याने हा ऐतिहासिक चित्रपट नाकारला होता. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (फोटो क्रेडिट्स: फिल्म पोस्टर)