

पटनामध्ये सुपर 30 कोचिंग क्लासेस चालवणारे प्रोफेसर आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित super 30 हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमातून प्रेक्षकांना आनंद कुमार यांच्याविषयी बरंच काही समजणार आहे. मात्र कमी लोकांना माहीत आहे की, सिनेमाचा रिअल हिरो एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.


काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखातीत आनंद कुमार यांनी या गोष्टीचा खुलासा केला. त्यांना एक गंभीर आजार असल्यानं एवढ्या कमी वेळात त्यांच्यावर सिनेमा बनला आहे. या मुलाखतीत आपल्या आजाराविषयी बोलताना आनंद कुमार भावुक झाले होते.


आनंद कुमार स्वतःला नशीबवान समजतात की ते स्वतःचा जीवनप्रवास त्यांच्या मृत्यूपूर्वी पाहणार आहेत. या मुलाखातीत त्यांनी सांगितलं माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे की जिवंतपणीच मी माझा जीवनप्रवास या बायोपिकमधून पाहणार आहे.


आनंद कुमार यांनी सांगितलं, काही वर्षांपूर्वी त्यांना कमी ऐकू येत असे. त्यावेळी त्यांनी चेकअप केल्यावर त्यांना समजलं की त्यांची 80 ते 90% ऐकण्याची क्षमता संपली आहे. पण त्यावर उपचार केल्यावरही काही फरक पडला नाही. त्यामुळे त्यांनी 2014 मध्ये राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्यांनी पुन्हा उपचार घ्यायला सुरुवात त्यावेळी त्यांनी ब्रेन ट्यूमरचं निदान झालं.


डॉक्टर्सनी आनंद कुमार यांना सांगितलं की, त्यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे आणि प्रत्येक ऑपरेशन नंतर त्याचा धोका वाढत आहे. ब्रेन ट्यूमरचा परिणाम त्यांच्या इतर अवयवांवरही होतं आहे. आनंद कुमार सांगतात 2014 मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनाही याबाबत समजलं होतं मात्र मी त्यानंतरही काम करत राहिलो.