

सनी लिओनीचं जीवन हे एका उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. शालेय वयात तिच्या आयुष्यात आलेल्या समस्या ते तिने अडल्ट इंडस्ट्रीमध्ये केलेलं पदार्पण या सर्व गोष्टी आता सर्वांना माहित आहे.


सर्वांना आता हेही माहित आहे कि अडल्ट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय सनीनं स्वतःच्या मर्जीनं घेतला होता आणि यात सर्वांना मागे टाकत ती अव्वल स्थानावर पोहोचली होती.


यामुळे सनीवर पैशांची बरसात होत असतानाच तिचा भाऊ संदिप वोहरा यानं आपल्या पॉकेटमनीचा खर्च सनीच्या फोटोंच्या माध्यमातून काढायला सुरुवात केली होती.


संदिपने 'मोस्टली सनी' या चित्रपटातून आपण सनीच्या ऑटोग्राफच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावल्याचा खुलासा केला आहे.


संदिप हॉस्टेलच्या रुममध्ये सनीची ऑटोग्राफ असलेलं पोस्टर लावत असे आणि जो कोणी त्याच्याकडे या पोस्टरची मागणी करत असे त्याच्याकडून पोस्टरच्या बदल्यात पैसे घेत असे.