एवढं बोलून सनी थांबली नाही ती पुढे म्हणाली की, ‘मी अशा अनेक पालकांना वेळेचं नियोजन करताना पाहिलं आहे. माझ्यासाठी हे थोडं कठीण आहे. कारण माझ्यासाठी प्रत्येक दिवस नवीन असतो. पण जेव्हा तुम्ही एकदा आई- बाबा होता तेव्हा आपसुक तुमच्या दिनक्रमात बदल होतो. तुम्ही वेळेचं नियोजन करायला लागता. आपल्या मुलांना पाहणं हे जगातलं सर्वात मोठं सुख आहे. हा माझ्या आयुष्यातला सर्वात उत्कृष्ट काळ आहे.’