

बॉलिवूडमध्ये नॅचरल ब्यूटी आणि टॅलेंटचं मिश्रण फार क्वचित पहायला मिळतं. खरंतर यालाच बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याचा फॉर्म्यूला मानला जातं. मात्र आज आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडच्या पहाडी सौंदर्यवतींविषयी ज्यांनी बॉलिवूडमध्ये सर्व रेकॉर्ड तोडले आणि आपलं स्थान या ठिकाणी पक्कं केलं.


हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे जन्मलेली यामी गौतम सध्या बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. अभिनेता आयुष्यमान खुरानासोबत 'विकी डोनर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी यामी आता फक्त बॉलिवूडच नाही तर तेलुगु, कन्नड, पंजाबी, मल्याळम आणि तमिळ सिने सृष्टीतही यशस्वी ठरली.


सेन्शुअलिटी आणि सौंदर्याची नवी व्याख्या घेऊन बॉलिवूडमध्ये आलेल्या सेलिना जेटलीनं पदार्पणाच सर्वांची वाहवा मिळावली. सेलिना मूळची शिमलामधील असून तिनं 2001 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. फरदीन खानसोबत 'जानशीन' सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे.


शिमलाची आणखी एक सौंदर्यवती साहेर बंबा, जी या वर्षीच्या अखेरपर्यंत सन्नी देओलचा मुलगा करण देओलसोबत 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिनं आपल्या मनमोहक हास्यानं तिनं स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.


90 व्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेली प्रीती झिंटा मूळची शिमलाची आहे. बॉलवूडची डिंपल गर्ल स्धाय सिनेमांपासून दूर असली तरी आपल्या नैसर्गिक सौंदर्यानं तिनं तिच्या काळात सर्वांनाच भूरळ घातली होती. प्रीती एका आर्मी फॅमिलीतून आलेली मुलगी आहे. बॉलिवूमध्ये येण्यासाठी तिनं आपलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं.


बॉलिवूडची बिनधास्त बाला कंगना रणौतला आता कोण ओळखत नाही. बॉलिवूडमधील कंगाचा प्रवास बराच खडतर ठरला आणि त्यातून ती सतत वादात राहिली. मात्र आपल्या अभिनय कौशल्यानं तिनं सर्वांची तोंडं बंद केली. कंगना हिमचल प्रदेशच्या अंबाला या छोट्याशा गावातून मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. तिचा 'गँगस्टर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. आज स्त्रीप्रधान भूमिकांना प्राधान्य देणारी अभिनेत्री म्हणून कंगनाची ओळख आहे.