'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून लतिका अर्थातच अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली आहे. अक्षया नुकतंच आपल्या शूटिंगमधून वेळ काढून सुट्टीवर गेली होती. तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अक्षया नाईक रिव्हर राफ्टिंग करताना दिसून येत आहे. अक्षयाचे हे फोटो ऋषिकेशमधील आहेत. याठिकाणी ती आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसली होती. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स मिळत आहेत. चाहतेच नव्हे तर तिचे कलाकार मित्रसुद्धा तिचं कौतुक करत आहेत. अक्षया नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अक्षयाचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तर, तुम्हालाही लक्षात येईल की तिला ट्रॅव्हलिंगची किती आवड आहे.