'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून अभिनेता समीर परांजपे घराघरात पोहोचला आहे. मालिकेतील अभि आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली आहे.
2/ 8
परंतु सध्या मालिकेत एक उत्कंठावर्धक वळण आलं आहे. आणि अनेक वर्षांचा लीप दाखवण्यात आला आहे. मालिकेतून अभ्या अर्थातच समीर परांजपे गायब आहे.
3/ 8
दरम्यान आता अभिनेता समीर परांजपे 'बिग बॉस मराठी' च्या चौथ्या सीजनमध्ये येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
4/ 8
राजश्री मराठीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एका अभिनेत्याचा पाठमोरा स्केच शेअर केला आहे. आणि बिग बॉसमध्ये सहभागी होणारा हा अभिनेता कोण ओळखण्यास सांगितलं आहे.
5/ 8
यावर युजर्स हा अभिनेता समीर परांजपे असल्याचा अंदाज लावत आहेत. दरम्यान मालिकेतून समीरने ब्रेक घेतल्याने या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे.
6/ 8
परंतु अभिनेता समीर परांजपे किंवा बिग बॉस मराठीच्या टीमने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय.
7/ 8
त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
8/ 8
समीर परांजपे खरंच या शोमध्ये सहभागी झाला तर त्याच्या चाहत्यांसाठी हे मोठं सरप्राईज असणार आहे.