'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिलाषा ही भूमिका साकारली होती. राधा सागरचं रियल आयुष्यात लग्न झालं आहे ही गोष्ट खूप कमी जणांना माहिती आहे. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राधा सागरने पहिल्यांदाच आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिषेकच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
2/ 8
‘अंकिता’ हे खलनायिकेचं पात्र साकारून राधाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिलाषा सुद्धा खलनायिका भूमिका साकारली.
3/ 8
अभिनेत्री राधा सागरचं रियल आयुष्यात लग्न झालं आहे ही गोष्ट खूप कमी जणांना माहिती आहे.
4/ 8
आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राधा सागरने पहिल्यांदाच आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
5/ 8
तिच्या नवऱ्याचं नाव सागर कुलकर्णी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे.
6/ 8
राधा सागरने दोघांचे अनेक फोटो शेअर करत लिहिलंय कि, ''हसण्याचे कारण तूच आहेस.. माझ्या चांगल्या-वाईट काळात तू नेहमीच माझ्यासाठी आहेस....''
7/ 8
पुढे ती म्हणतेय कि, '' मी खूप नशीबवान आहे की माझ्याकडे तू आहेस... तूच माझी ताकद, माझी कमजोरी, माझी सपोर्ट सिस्टीम, माझे सर्व काही आहेस.. .''
8/ 8
तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला असून तिच्या या पोस्टवर ते या दोघांना शुभेच्छा देत आहेत.