सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीची उंच भरारी; झळकणार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमात
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री लवकरच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या...
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड.
2/ 8
आदिती सध्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत नंदिनी हे पात्र साकारत आहे. तिची हि भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
3/ 8
छोट्या पडद्यावर झळकणारी आदिती आता लवकरच मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
4/ 8
आदिती लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
5/ 8
आदितीने या चित्रपटाचा भाग व्हायला मिळालं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने या पोस्टमध्ये स्वतःसाठीच लिहिलंय कि, ''डियर अदिती, काल तू तुझ्या स्वप्नांच्या दिशेनं छोटंसं पाऊल टाकत त्यांना अजून जवळ केलं आहेस !
6/ 8
पुढे ती म्हणतेय कि, ''छोट्या पडद्यावर तू 70 मिमीच्या स्क्रीनपर्यंत पोहचलीस, तू ते करून दाखवलंस! आणि मला तुझा खूप अभिमान आहे!''
7/ 8
आदितीने केलेल्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
8/ 8
अदिती द्रविड हिने पहिल्यापासून नाटकांमधून अभिनय केला होता पण 'माझ्या नवऱ्याची बायको’या मालिकेमुळे अदितीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये अदितीनं शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. आता आदिती मोठ्या पडद्यावर पोहचली आहे.