सध्या सगळीकडं कडाक्यची थंडी आहे. कर्लस मराठीवरील काही लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचे थंडीनं हुडहु़डी भरल्याचे फोटो समोर आले आहेत. कर्लस मराठीवरील लोकप्रिय मालिका राजा राणीची गं जोडी या मलिकेतील संजूचे देखील थंडीतील हुडहुडी भरल्याचे फोटो समोर आले आहेत. संजूने फुल स्वेटर घातलेली आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी फुलटू प्रयत्न करत आहे. तिचा हा थंडीवाला लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई मायेचे कवच या मालिकेतील कलाकारांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचं पेटवली. थंडीपासून बचाव करण्यासाठी या कलाकारांनी शेकोटी पेटवली आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका म्हणजे अक्षया नाईक देखील गाळ्या रंगाच्या स्वेटरमध्ये दिसली. शुटिंग वेळी अक्षया स्वेटर व कान पॅक करून सेटवर आवरताना दिसली. याशिवाय ती काही तरी पित असल्याचे देखील दिसले. या कलाकारांचा थंडीवाला लुक सोशल मीडियावर चर्चेत आहे.