

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. उत्तम अभिनय, योग्य संवाद लेखन अशा अनेक मालिकेच्या उजव्या बाजू आहेत. तारक मेहता ही मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर असते. या मालिकेतील अनेक जुने कलाकार आता मालिका सोडून गेले आहेत. त्यातलीच एक भूमिका आहे अंजली भाभीची (Anjali Bhabhi). सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच मालिकेत एन्ट्री घेतली.


कमी वेळातच सुनैना फौजदारने अंजली भाभीची भूमिका आपलीशी केली. सुनैना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिने नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo credit: instagram/@sunayanaf)


सुनैना फौजदार सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. रील लाइफमध्ये सरळ साधी अंजली भाभी साकारणारी सुनैना तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय बोल्ड आहे.