'बिग बॉस 16' मुळे टीव्ही अभिनेत्री सुम्बुल तौकीर प्रचंड चर्चेत आली होती. ' या शोमध्ये सुम्बुल तौकीर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहायची. हा शो संपल्यानंतरसुद्धा सुम्बुल तौकीर सतत चर्चेत आहे. सध्या सुम्बुल तौकीर आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. सुम्बुल तौकीर उटीमध्ये व्हेकेक्शनसाठी पोहोचली आहे. अभिनेत्री सतत तिथून आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. दरम्यान अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने आपल्याला काहीतरी ओरखडल्याचं दाखवलं आहे. अभिनेत्रीने आणखी एक फोटो शेअर करत आपल्याला माकडाने ओरखडल्याचं म्हटलं आहे.