चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच शाहरुख खानची लेक सुहाना खान सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपला फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुहाना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला ग्लॅमरस फोटो शेअर करत सर्वांनाच घायाळ केलं आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेसुद्धा सुहानाचे हे फोटो शेअर केले आहेत. सुहानाने या फोटोंमध्ये वेस्टर्न ड्रेस नव्हे तर ट्रॅडिशनल साडी परिधान केली आहे. लाल रंगाच्या या साडीमध्ये सुहाना अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. मनीष मल्होत्राने ज्याप्रकारे सुहानाचे फोटो शेअर केले आहेत, त्यावरून हि सुंदर साडी त्यांनीच डिझाईन केल्याचं लक्षात येतं. लाल साडी आणि बॅकलेस ब्लाऊजमध्ये सुहाना सर्वांनाच वेड लावत आहे. सुहानाने शेअर केलेल्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.