सुबोध भावे दिग्दर्शित नव्या सिनेमाचं नाव जाहीर; प्रमुख अभिनेत्रीचा चेहराही आला समोर
अभिनेता सुबोध भावे ( Subhodh Bhave) दिग्दर्शित नव्या सिनेमाचं नाव अखेर घोषित करण्यात आलं आहे. सिनेमासाठी सुबोधच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली असून. साताऱ्याच्या वाईमध्ये सिनेमाच्या शुटींगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे.
|
1/ 11
अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित नव्या सिनेमाची गेली अनेक दिवस चर्चा सुरू होती.
2/ 11
वाई येथे सुबोधच्या नव्या सिनेमाचं शुटींग सुरू आहे.
3/ 11
वाई हे सुबोधचं आवडतं गाव असल्याचं सांगत तिथे शुटींग करण्याचा आनंद त्यानं व्यक्त केला होता.
4/ 11
सिनेमाचं नाव मात्र सुबोधनं गुलदस्त्यात ठेवलं होतं. मात्र आज अखेर सुबोधनं स्वत: पोस्ट शेअर करत नव्या सिनेमाच्या नावाची घोषणा केली.
5/ 11
सुबोध भावे दिग्दर्शित 'मारवा' हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
6/ 11
'मनातलं गूज, डोळ्यांतलं पाणी, अबोलीच्या वाटेवर, चाफ्याची निशाणी, भेटींचे तराणे, चुकामुकींची विराणी "मारवा" एक हुरहूर लावणारी कहाणी', असं म्हणत सुबोधनं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव सांगितलं आहे.
7/ 11
सिनेमाच्या नावाची घोषणा करताना सिनेमातील अभिनेत्रीलाही सुबोधनं सर्वांसमोर आणलं आहे.
8/ 11
अभिनेत्री सायली संजीव 'मारवा' या नव्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
9/ 11
सायलीचा नवा सिनेमा पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.
10/ 11
मारवा या सिनेमाची कथा वैभव जोशी यांनी लिहिली आहे तर नितीन प्रकाश वैद्य यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.
11/ 11
सुबोध भावेनं अनेक महिने या सिनेमाच्या संहितेवर काम केलं आहे. दिग्दर्शक म्हणून सुबोधचा हा वेगळा प्रयत्न मारवाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे.