रामायण : हनुमान ते मंथरा… ‘या’ कलाकारांनी जगाला केलं अलविदा
लॉकडाऊन दरम्यान टीव्ही शो रामायण लोकप्रिय ठरत आहे. पण यातील काही कलाकांनी मात्र पूर्वीच या जगाचा निरोप घेतला आहे.
|
1/ 9
लॉकडाऊन दरम्यान टीव्हीचा लोकप्रिय शो रामायण पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आला आणि अनपेक्षितपणे या शोला पुन्हा एकदा पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळाला. पण या शोमधील काही लोकप्रिय कलाकार आता मात्र फक्त प्रेक्षकांच्या आठवणीत राहिले आहेत...
2/ 9
रामायणात हनुमंताची भूमिका साकारणारे अभिनेता दारा सिंग आज आपल्यात नाहीत. 12 जुलै 2012 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेली भूमिका अजरामर झाली.
3/ 9
रामायणात रावणाचा मोठा भाऊ बिभीषणाची भूमिका साकारणारे अभिनेेता मुकेश रावल यांचं नोव्हेंबर 2016 मध्ये निधन झालं.
4/ 9
रामायणात मंथराची भूमिका मराठमोळ्या अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारली होती. त्यांनी 24 फेब्रुवारी 1998 मध्ये जगाचा निरोप घेतला.
5/ 9
रामायणात राजा इंद्रजितची भूमिका साकारणारे अभिनेता विजय अरोरा यांचं 2 फेब्रुवारी 2007 ला निधन झालं.
6/ 9
अभिनेत्री जयश्री गडकर यांनी रामायणात रामाची आई कौशल्याची भूमिका साकारली होती. त्यांनी 29 ऑगस्ट 2008 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्या मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
7/ 9
रामायणातील कुंभकर्णाला तर कोणीच विसरु शकणार नाही. ही भूमिका साकरणारे अभिनेता नलिन दवे यांचं 1990 मध्ये निधन झालं.
8/ 9
रामायणात महाराणी सुनयना यांची भूमिका अभिनेत्री उर्मिला भट यांनी साकारली होती. त्यांचं 22 फेब्रुवारी 1997 ला निधन झालं.
9/ 9
सीतेचे वडील म्हणजे राजा जनक यांची भूमिका अभिनेता मुलराज राजदा यांनी साकारली होती. मुलराज आज आपल्यात नाहीत. 23 सप्टेंबर 2012 मध्ये त्यांचं निधन झालं. (संकलन : मेघा जेठे.)