PHOTO: अखेर कीर्ती झाली IPS ऑफिसर; मालिकेतील खास भागासाठी अभिनेत्री समृद्धी केळकरने घेतली विशेष मेहनत
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’(Phulala Sugandh Maticha) मालिकेत कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. जामखेडकर कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कीर्तीच्या IPS ट्रेनिंगसाठी अभिनेत्री समृद्धी केळकरनेही (Samruddhi Kelkar) प्रचंड मेहनत घेतली आहे.
|
1/ 9
कीर्तीचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. गेले दोन महिने या खास भागासाठी अभिनेत्री समृद्धी केळकरने विशेष मेहनत घेतली.
2/ 9
कीर्तीच्या मालिकेतल्या प्रशिक्षणासाठी खऱ्याखुऱ्या एनसीसी कॅडेट टीमची नेमणूक करण्यात आली होती.
3/ 9
कीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री समृद्धी केळकरने हे आव्हान स्वीकारलं. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीने हे खडतर प्रशिक्षणाचे सीन पूर्ण केले.
4/ 9
मालिकेतल्या या सीन्सविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, 'या मालिकेने मला अभिनेत्री म्हणून समृद्ध केलं आहे. संयम आणि सतर्कता या दोन महत्त्वाच्या गोष्टी मी या निमित्ताने शिकले'.
5/ 9
'कीर्तीसाठी हे आव्हानात्मक होतंच पण समृद्धी म्हणून माझीही कसोटी लागली. मी फारशी फिटनेस फ्रीक नाही. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतेय', असंही समृद्धी म्हणाली.
6/ 9
कीर्तीने मालिकेत बॉडी डबल न वापरता अनेक स्टंट सिक्वेन्स केले आहेत.
7/ 9
आयपीएस ऑफिसर बनण्यासाठी जे प्रशिक्षण घ्यावं लागतं ते मालिकेत आम्ही दाखवण्यात आलं आहे.
8/ 9
घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे.
9/ 9
कीर्तीचं आयपीएस होणं हे शुभम आणि जामखेडकर कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.