शाहरुख खानची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सुहाना 'द आर्चीस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरही 'द आर्चीस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदाही 'द आर्चीस'मधून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरुवात करणार आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरवही लवकरच सिनेसृष्टीत डेब्यू करणार आहे. शनाया करण जोहरच्या 'बेधडक' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. सैफ अली खान आणी अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम खानही बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज झाला आहे. तो करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. सनी देओलचा दुसरा मुलगा राजवीर देओल राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटात दिसणार आहे. हृतिक रोशनची चुलत बहिण पश्मिना रोशन 'इश्क विश्क रिबाऊंड'मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराजा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.