चालता फिरता बंगलाच! अल्लू अर्जुनच्या Vanity Van चे जबरदस्त PHOTO पाहाच
सेलिब्रिटींसाठी व्हॅनिटी त्यांच्या दुसऱ्या घराप्रमाणेच असते. शूटिंगवेळी ही व्हॅनिट त्यांच्यासोबत सेटवरच असते. साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची व्हॅनिट पाहून हैराण व्हाल.
अल्लू अर्जुनची व्हॅनिट व्हॅन म्हणजे चार चाकांवर फिरणारा एखादा बंगलाच आहे की काय, असं वाटू शकतं.
2/ 5
अल्लू अर्जुन अनेकदा त्याचे वॅनिटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अर्जुनची ही व्हॅनिट व्हॅन रेड्डी कस्टम कारवाने डिझाइन केली आहे. या व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये इतकी आहे.
3/ 5
त्याच्या व्हॅनिटीचं नाव 'Falcon' असून व्हॅनिटीबाहेर आणि आत त्याच्या नावाच्या सुरुवातीची अक्षरं AA लिहिलेली आहेत. व्हॅनिटीचं इंटिरियर ब्लॅक, व्हाईट आणि सिल्व्हर रंगाने केलेलं आहे.
4/ 5
व्हॅनिटीमध्ये रेकलायनर चेयरपासून लेदर सीट, मोठा आरसा आणि मनोरंजनासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत.
5/ 5
अल्लू अर्जुन अधिकतर वेळ आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधूनच ट्रॅव्हल करतो. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पुष्पा शूटिंगच्या दरम्यान, त्याच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला होता. परंतु त्यात कोणीही जखमी झालं नव्हतं.