बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखचं तेलुगू चित्रपटांशी फारच खास नातं आहे. कारण अभिनेत्रीने हिंदीपेक्षा जास्त साऊथ चित्रपटांमध्ये काम केलंआहे. ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीत पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. जेनेलिया कन्नड-तेलुगू अशा द्विभाषिक चित्रपटाद्वारे पडद्यावर कमबॅक करणार आहे. ही आनंदाची बातमी नुकतंच जेनेलियाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.