कन्नड अभिनेत्री संजना गलरानी आणि तिचा पती अजीज पाशा आई-वडील बनले आहेत. संजनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अभिनेत्रीला टॅग केले आहे आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून बाळाच्या आगमनाची घोषणा केली आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले, "अभिनंदन... तिला मुलगा झाला आहे." (All Photo Credit- Sanjjanaa Galrani Instagram)
संजनाने बिग बॉस कन्नडमध्येही सहभाग घेतला होता. मे 2020 मध्ये तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत तिने डॉ. अजीज पाशा यांच्याशी गुप्तपणे लग्न केलं. अभिनेत्रीने नंतर एका निवेदनात सांगितलं की, तिचं लग्न गुप्त नव्हतं. परंतु, ते सार्वजनिक करण्याचाही तिचा हेतू नव्हता. अभिनेत्रीने अजीज पाशा यांच्याशी मुस्लीम रीतीरिवाजांनुसार लग्न केल्याचं सांगितलं जातं. तिने आपला धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि संजना हे नाव बदलून माहिरा ठेवलं.
संजना अजीजला 16 वर्षांची असल्यापासून ओळखत होती. तो व्यवसायाने डॉक्टर आहे. संजनाने वयाच्या 35 व्या वर्षी कौटुंबिक जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि उघड केलं की, या प्रक्रियेत वजन वाढल्यामुळे ती तीव्र पाठदुखी सारख्या समस्यांशी झगडत होती. तिचं वजन 18 किलोंनी वाढलं होतं, जे तिच्या पाठदुखीचे एक कारण होते.