साऊथ स्टार नागा चैतन्य सध्या आपल्या 'Bangarraju' या चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात तो आपले वडील नागार्जुन यांच्यासोबत दिसणार आहे. या प्रमोशनच्या दरम्यान नागाने आपल्या आणि समंथाच्या नात्याबद्दल खुलासा करत म्हटलं, घटस्फोटाचा निर्णय योग्य होता. या निर्णयामुळे ते दोघेही आनंदी आहेत.