'या' कलाकारांनी नाकारला होता 'Pushpa', नंतर Allu Arjun ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या गाण्यांची आणि डायलॉग्सची सोशल मीडियावर प्रचंड चलती आहे. परंतु या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंत अल्लू अर्जुन नव्हे तर हा अभिनेता होता.
|
1/ 7
'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या गाण्यांची आणि डायलॉग्सची सोशल मीडियावर प्रचंड चलती आहे. परंतु या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंत अल्लू अर्जुन नव्हे तर हा अभिनेता होता.
2/ 7
'पुष्पा' या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंत महेशबाबू होता. परंतु अभिनेत्याने ही भूमिका आपल्या इमेजच्या अगदी विरोधी असल्याचं सांगत चित्रपटाला नकार दिला होता.
3/ 7
साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीलासुद्धा या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. परंतु बिझी शेड्युलमुळे ही भूमिका मल्याळम अभिनेता फहाद फासिलला मिळाली.
4/ 7
पूजा हेगडे- अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या आधी मुख्य नायिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंत पूजा हेगडे होती. परंतु ती प्रभाससोबत 'राधे श्याम' मध्ये व्यग्र असल्याने तिला नकार द्यावा लागला होता.
5/ 7
पुष्पामधील आयटम सॉंगसाठी समंथा प्रभूच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीला विचारणा करण्यात आली होती. परंतु तिने भरमसाठ मानधन मागितल्याने हा चित्रपट तिच्या हातातून गेला.
6/ 7
त्यांनतर डान्सर नोरा फतेहीला ही ऑफर देण्यात आली होती. परंतु तिनेही मानधन जास्त मागितल्याने हा चित्रपट तिच्या हातातून गेला.
7/ 7
अभिनेता नारा रोहितला या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. परंतु त्याने ती नाकारली. आज त्याला या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं जातं.