'बॉस माझी लाडाची’ या सोनी मराठीवरील मालिकेत मिहीर सध्या बॉसच्या आठवणीत आणि प्रेमात रमलेला दिसत आहे. खऱ्या आयुष्यात मात्र मिहीर हे पात्र साकारणारा अभिनेता आयुष संजीव पावसाळ्याचा आनंद लुटताना दिसत आहे. त्याने एका लाल छत्रीसोबत एक भन्नाट फोटोशूट केलं आहे. या लाल छत्रीवाल्या नव्या फोटोने बरच लक्ष वेधून घेतलं जात आहे. आयुषला पावसाळ्यात धमाल करायला आवडते असं त्याच्या फोटोमधून समजत आहे. त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो पावसात कमाल नृत्य करताना दिसत होता. सध्या अनेक कलाकारांचे मान्सून लुक लोकप्रिय होताना दिसत आहेत. [caption id="attachment_727597" align="aligncenter" width="1600"] यातच आयुषने केलेल्या फोटोशूटमुळे त्याच बरंच कौतुक होताना दिसत आहे.[/caption]