बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. पाहा तिचे काही लक्षवेधी फोटो. लेडी बॉस अंदाजात सोनम दिसून येत आहे. सध्या सोनम चित्रपटांत कमी दिसते पण तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहते. २०१८ साली विवाह बंधनात अडकल्यानंतर सोनम फारच कमी चित्रपटांत दिसली होती. लवकरच ती 'ब्लाइंड ' या चित्रपटातही दिसणार आहे. सोनम सध्या जास्तीत जास्त वेळ पती आनंद अहुजासोबत घालवताना दिसते. याशिवाय कुटुंबासोबतही अनेक समारंभात सहभागी असते. सोनमची फॅशन तिच्या कान्स फिल्म फेस्टीवलमधील एन्ट्रीनंतर आगळीवेगळी झाल्याचं सोनमने म्हटलं होतं. पूर्वी आपलं राहणीमान फार साधं होत असंही तिने म्हटलं होतं. पण कान्स फिल्मफेस्टीवल नंतर सोनमने स्वतःवर निरनिराळे फॅशन प्रयोग करायला सुरूवात केली. सोनम बिनधास्तपणे स्वतःवर फॅनचे निरनिराळे प्रयोग करते.