सोनालीचा फिटनेस फंडा काय आहे याची उत्सुकता होतीच. 'काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात ब्रेकथ्रू आला. आपण खातो त्या प्रमाणात व्यायाम करतो का? नक्की काय खातो? या सगळ्याचा मी विचार करायला लागले ती आहारतज्ज्ञ डाॅ. सरिता डावरे यांच्यामुळे.' सोनाली सांगत होती. अन्नाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी नेहमीच महत्त्वाची असली पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे.
सोनाली फिटनेस फंडामध्ये आपल्या विश्रांतीलाही महत्त्व देते. ' एकदा माझा उजवा हात दुखावला होता. बरेच दिवस मनगट दुखत होतं. तेव्हा मला विश्रांतीचं महत्त्व पटलं. आपण जितक्या प्रमाणात व्यायाम करतो तितक्या प्रमाणात विश्रांती घेत नाही.' सोनालीला पूर्वी विश्रांती घेतली की अपराधी वाटायचं. पण आता तिचा दृष्टिकोनच बदललाय. ती सांगते, ' जे मस्त विश्रांती घेतात त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. कमी विश्रांती मिळाली की मानसिक संतुलन बिघडतं.'