सोनाली कुलकर्णीच्या फिटनेसचं रहस्य दडलंय भाकरी आणि टेकडीत!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच उत्साही दिसते. तिच्या या फिटनेस फंडाचं काय रहस्य आहे , हे वाचा तिच्याच शब्दात
|
1/ 13
आजकाल तुमचं वय काय, तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात याचा आणि फिटनेसचा काहीही संबंध नाही. हल्ली ग्लोबल वाॅर्मिंग वाढलंय, तणाव वाढलाय, स्पर्धा वाढलीय.. त्यामुळे प्रत्येकालाच फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं.
2/ 13
फिटनेस म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक फिटनेसही महत्त्वाचा. आपण त्यालाच महत्त्व देत नाही. तुमचं मन नियंत्रणात नसेल तर शरीराचा फिटनेस कितीही ठेवलात तरी त्याचा उपयोग नाही.
3/ 13
नुसता व्यायाम नाही, तर त्याचबरोबर आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. लोक हल्ली वेगवेगळे डाएट फाॅलो करतात. ती एक फॅशनच बनलीय.
4/ 13
खरं तर हे डाएट किट पेशंटसाठी असतं. त्याला प्रमाण असतं.
5/ 13
आपण ज्या वातावरणात लहानाचे मोठे झालो. जे खाऊन मोठे झालो, ते फाॅलो करा. ज्यामुळे शरीरावर काही दुष्परिणाम जाणवणार नाहीत ते खा.
6/ 13
तुम्ही भाकरी खा, भाज्या खा. फायबरसाठी भाकरी खा. आहार नीट ठेवलात की मग 25 टक्के सपोर्ट असतो व्यायामाचा.
7/ 13
मला एकाच प्रकारच्या व्यायामाचा कंटाळा येतो. मग मी योगा करते.
8/ 13
मी योगाचे वेगवेगळे प्रकार करते. त्यात अष्टांग योग करते.
9/ 13
मी कधी फक्त 45 मिनिटं रनिंग करते. 10 किमी नाॅनस्टाॅप रनिंग करते.
10/ 13
'मी पुण्याला गेल्यावर सकाळी मी आणि माझा भाऊ टेकडीवर धावत जातो. तो उत्तम व्यायाम आहे.
11/ 13
तुम्ही जितकं बाहेर चालाल, तेवढा चांगला व्यायाम असतो.
12/ 13
पुण्याला सकाळच्या फ्रेश वातावरणात ताजंतवानं वाटतं. कधी मी स्वीमिंगही करते.
13/ 13
सोनालीनं आपल्या फिटनेसचं रहस्य तर सांगितलं. सोनालीचे दोन सिनेमे तयार आहेत. एक मृणाल कुलकर्णीनं दिग्दर्शित केलेली ती अँड ती. दुसरी अमृता सुभाषसोबत तिचा सिनेमा येतोय.