जन्नत फेम सोनल चौहान का झाली बॉलिवूडमधून गायब? काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई
सोनलनं का ठोकला बॉलिवूडला रामराम?
|
1/ 10
इमरान हाशमीच्या जन्नत या चित्रपटातून नावारुपास आलेली सोनल चौहान कधीकाळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची.
2/ 10
जन्नत या चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशामुळं तिला जन्नत गर्ल असंच म्हटलं जाऊ लागलं होतं. मात्र इतकी प्रसिद्धी मिळवूनही ती एकाएकी बॉलिवूडमधून गायब झाली.
3/ 10
आज सोनलचा वाढदिवस आहे. 34 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
4/ 10
जन्नत या चित्रपटामुळं सोनलला तुफान लोकप्रियता मिळाली. तिचा निरागस चेहरा पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमातच पडले होते.
5/ 10
मात्र तरी देखील त्यांनंतर सोनलला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळालं नाही. ती 3Gया चित्रपटात झळकली परंतु तो चित्रपट तिकिटबारीवर आपटला.
6/ 10
एकाच चित्रपटानंतर तिच्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का लावण्यात आला. परिणामी तिनं दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा मार्ग निवडला.
7/ 10
तिथं तिनं रेन्बो, लेजंड, सिंबा, शेर, पलटन यांसारख्या काही अक्सनपट चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु या चित्रपटांमध्ये तिला आपलं अभिनय कौशल्य दाखवता आलं नाही. कारण चित्रपटाची पटकथा पूर्णपणे अभिनेत्यांवर लक्ष केंद्रित करणारी होती.
8/ 10
अखेर सिनेसृष्टीत सातत्यानं मिळणारं अपयश पाहून तिनं चित्रपटांपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.
9/ 10
सोनलचा जन्म मणिपूरमधील एक राजघरात झाला आहे. सध्या ती लंडनमध्ये राहात असून मॉडलिंग करतेय.
10/ 10
चित्रपटांमध्ये सोनलला अपयश मिळालं असलं तरी मॉडलिंगमध्ये मात्र सध्या ती यशाच्या शिखरावर आहे.