सोनाक्षी सिन्हाचा हॉट अंदाज, 'दबंग गर्ल'चा मालदीव स्पेशल लुक सोशल मीडियावर हिट
इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) देखील सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर समुद्रावरील अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.


बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, टेलिव्हिजन सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. या यादीमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं (Sonakshi Sinha) देखील नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्रीने गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर तिचे बोल्ड अंदाजातील काही फोटो शेअर केले आहे. समुद्रावरील हे फोटो खूपच स्टनिंग आहेत. (फोटो सौजन्य- Instagram @aslisona)


लाल रंगाच्या ड्रेसमधील हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. निळाशार बॅकग्राउंडमध्ये तिचा लुक खुलून दिसत आहे. सोनाक्षीचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे (फोटो सौजन्य- Instagram @aslisona)


सोनाक्षीने सोशल मीडियावरून सांगितले आहे की, तिची मालदीवमधील सुट्टी संपली आहे. ती पुन्हा याठिकाणी येईल असंही तिनं म्हटलं आहे (फोटो सौजन्य- Instagram @aslisona)


मालदीवमधील फोटो अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट केले आहेत. सध्या कोविड 19 च्या साथीमुळे बॉलिवूडही शांत असल्यानं बहुतांश सेलेब्रिटीज सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालदीवमध्येच गेले असल्याचं दिसत आहे. यामध्ये तापसी पन्नू, नेहा धुपिया ते बॅडमिंटनपटू सायना नेहवालपर्यंत अनेक सेलिब्रिटीजचा समावेश आहे. नेटिझन्स यावरुन सेलिब्रिटींना ट्रोल देखील करत आहेत. (फोटो सौजन्य- Instagram @aslisona)