बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल यांच्या जोडीला त्यांचे चाहते खूप पसंत करतात. शो संपल्यावरही त्या दोघांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. आजकाल त्या दोघांचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत जे पाहून सिद्धार्थ शुक्ला-शहनाज गिल यांनी लग्न केल्याचं बोललं जात आहे.
सिद्धार्थ शुक्ला-शहनाज गिलचे खरोखर लग्न झाले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. फिल्मीबीटच्या एका रिपोर्टनुसार, शहनाज आणि सिद्धार्थ याचं लग्न झालं आहे. दोघांनी गुपचूप लग्न केलं आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी कोणालाही कळू न देता लग्न करून घेतलं. ( Photo Credit -@sidnaaz_obsessed20/Instagram )
काही दिवसांपूर्वी शहनाज गिलच्या वाढदिवशी सिद्धार्थ शुक्ला तिच्यासोबत मस्ती करताना दिसून आला होता. त्या सेलिब्रेशनमध्ये सिद्धार्थच नव्हे तर त्याची आई रीता शुक्ला देखील शहनाजच्या वाढदिवसाला हजर होती. यावरून शहनाज सिद्धार्थच्या कुटुंबाच्या अगदी जवळ आली आहे हे कळून येत आहे. ( Photo credit - @sidnaaz_obsessed20/Instagram)