अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) गुरूवारी सकाळी अचानक जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याणे सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या आईच्या अगदी जवळ असणारा सिद्धार्थ आता तिला सोडून गेला आहे.
2/ 7
वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या कुटुंबाप्रमाणेच त्याच्या लाखो चाहत्यांनाही तो दुःखात लोटून गेला आहे.
3/ 7
सिद्धार्थला आई तसेच दोन बहिणी आहेत. आपल्या कुटुंबाच्या तो अगदी जवळ होता. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने कुटुंबासोबत फोटो शेअर केले होते.
4/ 7
सिद्धार्थचे वडील हे मुंबईत सिव्हील इंजीनियर होते. तसेच त्यांनी रिझर्व बॅकेतही काम केलं होतं. मात्र सिद्धार्थच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळातच त्यांनीही जगाचा निरोप घेतला होता.
5/ 7
मुळचं उत्तर प्रदेशचं असलेलं शुक्ला कुटुंब अनेक वर्षे मुंबईतच वास्तव्यास आहे. सिद्धार्थचा जन्मही मुंबईतच झाला होता.
6/ 7
सिद्धार्थच्या जाण्याने त्याच्या आईवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सकाळी त्याचे कुटुंबिय कुपर रुग्णालयात पोहोचले होते.
7/ 7
बालिका वधू नंतर बिग बॉसने त्याला मोठी ओळख निर्माण करून दिली होती. करिअरच्या उच्च शिखरावर असताना सिद्धार्थ अचानक काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या चाहत्यांकडून मोठी हळहळही व्यक्त केली जात आहे.