सिद्धार्थ-मितालीची स्वप्नपूर्ती! मराठमोळ्या जोडीने शेअर केली 'गुड न्यूज'
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने नुकतंच एक गुड न्यूज दिली आहे.
|
1/ 8
मराठीतील सर्वात क्युट कपल म्हणून मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांना ओळखलं जातं. या दोघांच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत असतात. म्हणूनच चाहत्यांना त्यांच्यबद्दल प्रत्येक अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं.
2/ 8
आजही या जोडीबद्दल अशीच एक मोठी अपडेट समोर आली आहे.या दोघांनी मुंबईमध्ये आपलं पहिलं घर खरेदी केलं आहे.
3/ 8
मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की, या स्वप्ननगरीध्ये कुठंतरी आपलंही एक छोटसं घरकुल असावं.
4/ 8
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचं आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे. याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे.
5/ 8
या दोघांनी आपला फोटो शेअर करत 'नवी सुरुवात.. मुंबईतील पहिलं घर' असं म्हटलं आहे.
6/ 8
सिद्धार्थ आणि मितालीने ही गुड न्यूज देताच चाहत्यांसोबतच कलाकारांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
7/ 8
सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत ते आपल्या चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतात.
8/ 8
चाहतेही त्यांच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात.