Siddharth Jadhav: आपल्या सिद्धूनं आई वडिलांसाठी केलंय लै भारी काम; वाचून तुम्हीही कराल कौतुक!
अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. पण यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा होता. आज त्याने त्याचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे,
अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली.
2/ 8
पण यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा होता. कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. याबद्दल सिद्धार्थने अनेकदा खुलासा केला आहे.
3/ 8
पण आज सिद्धार्थ जाधवने त्याचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.
4/ 8
ते म्हणजे त्यांनी आई वडिलांना घर घेऊन दिलं आहे.
5/ 8
नुकताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धार्थने याविषयीची माहिती दिली आहे.
6/ 8
सिद्धार्थने घराबाहेरील नेमप्लेटचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याच्या आई आणि वडिलांचं नाव आहे.
7/ 8
हा फोटो शेअर करत त्याने म्हटलंय कि, 'स्वप्नपूर्ती...हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.'
8/ 8
सिद्धार्थच्या या पोस्टवर आता चाहते आणि कलाकार कमेंट करत त्याचं अभिनंदन करत आहेत.