श्रुती मराठे ही मराठी मनोरंजसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली श्रुती विविध चित्रपट आणि मालिकांद्वारे गेली दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील श्रुतीने असेच काही बोल्ड फोटो शेअर केले होते. मात्र यामध्ये केलेल्या अती मेकअपमुळे तिला ट्रोल केलं जात आहे. घरातील लहान मुलं घाबरतील, इतका रंग लावण्याची गरज नाही, मेकअपचा मोक्कार थर, काही गरज आहे का? अशा प्रतिक्रिया तिला ट्रोल केलं जात आहे.