Shruti Haasan: मानसिक आजाराशी झुंज देतेय श्रुती हासन? अखेर समोर येत सांगितलं सत्य
कमल हसनची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन कायम चर्चेत असते. नुकतंच तिला मानसिक समस्या असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. आता त्यावर श्रुतीने मौन सोडलं आहे.
कमल हसनची मुलगी श्रुती हासन लवकरच वॉल्टेअर वीरैया या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-लाँच कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये अभिनेत्री अनुपस्थित होती.
2/ 8
कार्यक्रमात न दिसल्याने, तिला मानसिक समस्या आहे आणि त्यामुळेच ती कॅमेऱ्यासमोर आली नाही असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
3/ 8
आता या वृत्तांवर श्रुती हसनची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा दाव्यांचा निषेध करताना त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच तिने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचं खरं कारण देखील सांगितलं आहे.
4/ 8
व्हायरल फिव्हरमुळे कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही, असे तिने ट्विटरवर सांगितले आहे. यासोबतच त्यांनी एका लांबलचक पोस्टमधून आपला संतापही व्यक्त केला आहे.
5/ 8
श्रुतीने नोटमध्ये लिहिले आहे की, "ठीक आहे...मानसिक आरोग्य या विषयावर येणाऱ्या अशा प्रतिक्रियांमुळेच लोक यावर बोलणं टाळतात. मी नेहमी मानसिक आरोग्यावर बोलत राहीन. मी नेहमी माझ्या तब्येतीची काळजी घेईन.'
6/ 8
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की श्रुती तिच्या आगामी 'द आय' चित्रपटाच्या ग्रीस शेड्यूलनंतर 100 टक्के सक्रिय नाही कारण ती मानसिक आजाराशी झुंज देत आहे. पण श्रुतीने या दाव्यांचं खंडन केलं आहे.
7/ 8
वॉलटेर वीरैयाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 13 जानेवारीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट एकाच दिवशी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
8/ 8
श्रुतीचा वीरा सिम्हा रेड्डीही त्याच दिवशी रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला होता जो लोकांना खूप आवडला होता.