जेष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांची कन्या श्रिया वडिलांप्रमाणेच एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठीसोबतच तिने हिंदी चित्रपटांमध्येही दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच श्रिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. यावेळी तिने स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून तिने पावसाळ्याची खास तयारी करत असल्याचं म्हटलं आहे. श्रियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्याचं तोंड भरून कौतुक केलं आहे.