

प्रसिद्ध गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agarwal) हनिमूनला गेला आहे. हनीमूनसाठी त्यांनी श्रीनगर हे डेस्टिनशन निवडलं आहे. काश्मीर खोऱ्यात हे दोघं एकमेकांसोबत रोमँटिंक क्षण अनुभवत आहेत. आदित्यने त्याच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ते दोघंही अतिशय आनंदी दिसत आहेत. सोबतच श्रीनगरमधील सौदर्यंही पाहायला मिळत आहे.


आदित्यने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्यातलं स्टाँग बॉडिंग दिसून येत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंना एक कॅप्शन दिलं आहे. यात त्याने लिहीलं आहे, ‘सूर्यास्त, शांतता, श्वेता आणि शिकारा काय सुंदर दृश्य आहे ना?’ एका शिकाऱ्यात आदित्य आणि श्वेता भटकत असताना हा फोटो काढलेला आहे.


आदित्य नारायणने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी लाइक केलं आहे. तसंच त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काँमेंट्स करुन त्यांचं अभिनंदनही केलं आहे.


या आधी आदित्यने हनिमूनच्या सुरूवातीला एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्याने कॅप्शन दिलं होतं, ‘हनीमूनची सुरुवात....पृथ्वीवरच्या स्वर्गावर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच’


काही दिवसांपूर्वीच आदित्य नारायणने त्याच्या आणि श्वेताच्या नात्याबद्दल सोशल मीडियवरुन माहिती दिली होती. जवळजवळ 11 वर्षांपासून ते एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते.