Shraddha Kapoor च्या Floral लेहेंगा-ब्लाउजवर खिळल्या चाहत्यांचा नजरा, अभिनेत्रीच्या Boldness वर चाहते फिदा!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या क्युटनेसवर सगळेच फिदा आहेत. परंतु आज अभिनेत्रीने हटके पोस्ट करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या क्युटनेसवर सगळेच फिदा आहेत. परंतु आज अभिनेत्रीने हटके पोस्ट करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
2/ 8
श्रद्धा कपूरने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही ट्रॅडिशनल लुकमधील फोटोज शेअर केले आहेत.
3/ 8
यामध्ये अभिनेत्रीने पेस्टल कलरचा सुंदर असा घेरदार लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावर रंगीबेरंगी फुले दिसून येत आहेत.
4/ 8
अभिनेत्री या सर्व फोटोंमध्ये एखाद्या परिकथेतील परीसारखी दिसत आहे. विशेष म्हणजे श्रद्धाने फोटो शेअर करत 'तुमचा परिकथेवर विश्वास आहे का?' असा प्रश्न केला आहे.
5/ 8
श्रद्धा कपूरचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
6/ 8
चाहते अभिनेत्रींच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक करत आहेत. शिवाय काही कलाकारांनीही अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
7/ 8
श्रद्धा कपूर गेली अनेक दिवस मोठ्या पडद्यापासून दूर होती. चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते.
8/ 8
चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण अभिनेत्री लवकरच रणबीर कपूरसोबत एका चित्रपटात झळकणार आहे.