चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आणि खास करून अभिनेत्रींना आपल्या फिटनेसवर आणि चेहऱ्यावर विशेष लक्ष द्याव लागतं. त्यांना सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक फेस ट्रिटमेंट घ्याव्या लागतात. मात्र कधीकधी त्यामुळे त्यांना भारी नुकसानही मोजावं लागतं. असंच काहीसं झालं ते अभिनेत्री रायजा विल्सनसोबत. अशाच एका ट्रीटमेंटमुळे तिच्या चेहऱ्याची वाट लागली आहे.
मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मला भेटतही नाहीत आणि माझ्याशी संवादही साधत नाहीत. त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता, त्या शहरातून बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. माझी पोस्ट पाहून अनेक लोकांनी म्हटलं आहे, की त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आधीही असेच प्रकार घडले आहेत, असंही रायजा म्हणाली.