उषा नाडकर्णी ते रेणुका शहाणे ..या लोकप्रिय अभिनेत्री करतायत मोठ्या गॅपनंतर टीव्ही विश्वात कमबॅक!
अनेकवेळा लग्न, प्रेग्नंसी, आजारपण या आणि अनेक कारणांमुळे अभिनेत्री गॅप घेताना दिसतात. मराठी मनोरंजन विश्वातील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या एका मोठ्या गॅपनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसत आहेत.
अनेकवेळा लग्न, प्रेग्नंसी, आजारपण या आणि अनेक कारणांमुळे अभिनेत्री गॅप घेताना दिसतात. मराठी मनोरंजन विश्वातील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या एका मोठ्या गॅपनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसत आहेत.
2/ 6
उषा नाडकर्णी- मालिका विश्वातील खडूस सासू म्हणून उषा नाडकर्णी सर्वांना परिचित आहेत. त्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसल्या होत्या. आता त्या एका मोठ्या गॅपनंतर पुन्हा खडूस सासूबाईच्या भूमिकेत सुंदर आमचं घर या मालिकेत दिसणार आहेत.
3/ 6
मधुरा वेलणकर- मधुरा वेलणकरने 12 वर्षाच्या गॅपनंतर तुमची मुलगी काय करते या क्राईम थ्रिलर मालिकेतून टीव्ही विश्वात कमबॅक केले आहे.
4/ 6
शिल्पा तुळसकर-झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेच्या माध्यमातून शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर परत येत आहेत.
5/ 6
संचिता कुलकर्णी- संचिता कुलकर्णीने 2015 मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिनं हिंदी व विविध भाषेतील प्रोजेक्ट केले आता. मोठ्या गॅपनंतर तिनं सुंदर आमचं घर या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
6/ 6
रेणुका शहाणे- हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे या त्यांच्या हस्यामुळे अनेकांना घायाळ करतात. आता त्या मोठ्या गॅपनंतर झी मराठीच्या बॅंड बाजा वरात या शोच्या माध्यामातून छोट्या पडद्याकडे वळल्या आहेत.