चहापासून-सी फूड पर्यंत सर्व काही विकतात सेलिब्रिटी, जगभरात उघडलेत रेस्टोरेंट, होतेय कोटींमध्ये कमाई
Bollywood Stars Expensive Restaurant: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता सुनील शेट्टी, धर्मेंद्र आणि प्रियांका चोप्रा यांसारखे प्रसिद्ध कलाकार फक्त अभिनय आणि जाहिरातीतूनच पैसे कमवत नाहीत. तर या सेलिब्रेटींचे देशात आणि परदेशात मोठमोठे रेस्टॉरंट्स आहेत जिथून ते प्रचंड पैसा कमावतात.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता सुनील शेट्टी, धर्मेंद्र आणि प्रियांका चोप्रा यांसारखे प्रसिद्ध कलाकार फक्त अभिनय आणि जाहिरातीतूनच पैसे कमवत नाहीत. तर या सेलिब्रेटींचे देशात आणि परदेशात मोठमोठे रेस्टॉरंट्स आहेत जिथून ते प्रचंड पैसा कमावतात.
2/ 8
मुंबईत सीफूडची खूप क्रेझ आहे. त्यामुळे वरळीमध्ये सी फूड मिळणारं प्रसिद्ध बेस्टियन रेस्टॉरंट आहे. ज्याची मालकीण शिल्पा शेट्टी आहे. येथे विविध प्रकारचे सी फूड उपलब्ध आहेत. याशिवाय शिल्पा शेट्टीने पिझ्झासाठी पिझ्झा रेस्टॉरंटही उघडले आहे.
3/ 8
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी एक यशस्वी उद्योजक आहे. अभिनेत्याचं एक लोकप्रिय डायनींग रेस्टोरंट आणि बार आहे. याआधी ९० च्या काळातही सुनील शेट्टी तोच व्यवसाय करत असे.
4/ 8
बॉलिवूडचे सदाबहार अभिनेता धर्मेंद्रसुद्धा यामध्ये मागे नाहीत. ते 'गरम-धरम' नावाच्या ढाब्याची चैन चालवतात. त्यांचे अनेक शहरात असे ढाबे आहेत.
5/ 8
बॉबी देओलही वडील धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉटेल व्यवसायात सक्रिय झाला आहे. बॉबी मुंबईतील अंधेरी येथे 'समप्लेस एल्स'' नावाचं रेस्टॉरंट चालवतो. येथे स्वादिष्ट भारतीय आणि चायनीज खाद्यपदार्थ मिळतात.
6/ 8
'राज' फेम अभिनेता डिनो मोरियासुद्धा या व्यवसायांत सक्रिय आहे. सुरुवातीला त्याने जीम उघडली होती. मात्र आता तो कॅफेचा मालक आहे.
7/ 8
प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये 'सोना' नावाचं भारतीय रेस्टोरंट उघडलं आहे.
8/ 8
विराट कोहली आणि अनुष्का शर्मानेसुद्धा 'वन8 कम्युन' नावाचं आलिशान रेस्टोरंट सुरु केलं आहे. विशेष म्हणेज दिवंगत अभिनेते-गायक यांच्या बंगल्यात त्यांनी हे रेस्टोरंट उघडलं आहे. त्यांनी ही जागा भाड्याने घेतली आहे.